Breaking News

युसुफ मेहरअली सेंटरमध्ये महिला मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

युसुफ मेहरअली सेंटरच्या वतीने शनिवारी (दि. 12) बांधनवाडी येथील मधू प्रमिला दंडवते संकुलात जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

युसुफ मेहर अली सेंटरच्या व्यस्थापन समिती सदस्य ऋता श्रीधर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यास युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारीख, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. सुरेखा दळवी, उपाध्यक्ष हरीश शहा, प्रकल्प संचालक सुरेश रासम, व्यवस्थापन समिती सदस्य नितीन आनेराव, डॉ. जिंतूरकर, श्रिया फाउंडेशन पालेच्या संचालिका स्मिता म्हात्रे, आपटा ग्रामपंचायत सरपंच नाजनीन शेख, कर्नाळा ग्रामपंचायत सदस्य दीक्षिता पाटील आदी उपस्थित होते.

युसूफ मेहेरअली सेंटरचे प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विभाग प्रमुख मालती म्हात्रे यांनी नियोजनासह सूत्रसंचालन, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी प्रस्तावना तर बाळकृष्ण सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या महिला मेळाव्यास परिसरातील शेकडो महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याबद्दल प्रकल्प संचालकांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply