Breaking News

कामोठे वसाहतीत गुटख्याचा साठा जप्त

पनवेल : वार्ताहर

कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा गावामध्ये एका बंद खोलीमध्ये साठवणूक करून ठेवलेल्या गुटख्याच्या दोन गोणी असलेला सुमारे दीड ते दोन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने जप्त केला आहे. यातील चार आरोपींपैकी दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. याबाबतचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी गुटखा विक्रीबाबत कारवाईची मोहीम घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन काम सुरू असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गोपनिय बातमीदारामार्फत कामोठे वसाहतीतील नौपाडा गावामध्ये एका बंद खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार नौपाडा गावातील त्या बंद खोलीच्या भागामध्ये कक्ष 3 गुन्हे शाखेकडुन सापळा रचण्यात आला होता व छापा टाकला.

या वेळी दोन गोणी भरून असलेला सुमारे दीड ते दोन लाच रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला. या वेळी चार आरोपीपैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहे. यांचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply