Breaking News

मविआ सरकारचा तीव्र निषेध

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पोलीस नोटीसची पनवेलमध्ये भाजपकडून होळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक एक घोटाळे बाहेर काढत असल्याने महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित असताना उलट फडणवीस यांनाच सरकारने पोलिसांमार्फत नोटीस पाठवली. हा सर्व प्रकार बघता महाराष्ट्रातील जनता संतापली असून या नोटिसीची रविवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2021मध्ये एक पत्रकार परिषत घेऊन मविआ सरकारचा गृहखात्यातील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता तसेच त्याचे पेन ड्राईव्ह, सर्व पुरावे त्यांनी त्याच दिवशी दिल्लीला जाऊन देशाच्या गृह सचिवांकडे सादर केले. या बदल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करीत आहे. असे असताना झालेला घोटाळा दाबण्यासाठी फडणवीस यांनाच पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात आली. त्यामुळे भाजप आक्रमक झाला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्देशित केल्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नोटिसीची रविवारी होळी करण्यात आली. खांदा कॉलनीतही नोटिसीची जाहीर होळी केली गेली. या वेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व नगरसेवक विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, नगरसेविका चारुशीला घरत, हेमलता म्हात्रे, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, गोपीनाथ मुंडे, संजय जैन, श्रीनिवास कोडरू, मोतीलाल कोळी, भीमराव पोवार, महिला मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा जोरदार घोषणा देऊन तीव्र निषेध केला.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply