Breaking News

महाडमध्ये बँकेत बनावट सोन ठेवून अपहार; 18 जणांवर गुन्हा दाखल

महाड ः प्रतिनिधी

सोनाराशी संगमत करून आरोपींनी महाड येथील कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत बनावट सोन ठेवून घेतलेल्या कर्जापैकी 17 लाख 45 हजारांचा अपहार केला. या प्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महाडमधील अनेक बँकामध्ये अशा प्रकारचे अपहार झाले असून प्रतिष्ठित लोक यांत गुंतल्याची चर्चा आहे. महाडमधील कॅ. आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत 31 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या सोने तपासणीत सराफ सुधाकर सागवेकर याच्याशी संगमताने काही लोकांनी मिळून बनावट सोने ठेवून कर्ज उकळल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये बँकेने 17 लाख 45 हजार 91 रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी 12 मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी सुधाकर विठोबा सागवेकर, ऋतुजा राजेंद्र जाधव, राजेंद्र किसन जाधव, रंजित हरिश्चंद्र जाधव, रेवती रंजित जाधव, संजना समीर निगडेकर, संध्या संजय टेंभे, प्राची महेश आर्ते, सुशिला लक्ष्मण भिंगारे, वैभव बंडू धर्माधिकारी, महेश तुकाराम घरटकर, दर्शन रवींद्र पवार, अशोक सोनू नगरकर, शिल्पा अशोक नगरकर, अक्षय मंगेश बामने, जतिन मनोहर पवार, श्वेता श्रीरंग पालांडे, भूपेंद्र विठोबा पवार यांच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply