सातार्‍यातील पवारवाडी शाळेत ‘रयत’चा वर्धापन दिन साजरा

सातारा : रामप्रहर वृत्त
ज्या ज्या गावांना डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पाय लागले त्या गावांचा उद्धार झाला, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. सातारा जिल्ह्यातील पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील पवारवाडी येथील संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी (दि. 4) आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या सोहळ्यास सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील, ‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख, माजी आमदार सदाशिव सपकाळ, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि रयतसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या शाळेसाठी 50 लाख रुपयांची मदत केली आहे. त्याबद्दल त्यांचे या वर्धापन दिन सोहळ्यात आभार मानण्यात आले.

Check Also

युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा …

Leave a Reply