म्हसळा : प्रतिनिधी : तालुक्यातील शिवकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकाळ पूर्ण झाल्याने शैलेश कुमार पटेल यांनी त्यांच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संचालक मंडळातील कृष्णा कोबनाक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. के. आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या विशेष सभेला कृष्णा कोबनाक यांच्यासह व्हाईस चेअरमन दिलीप कांबळे, संचालक महेंद्र पारेख, शैलेश कुमार पटेल, मंगेश म्हशीलकर, प्रकाश रायकर, संचालिका सविता काणसे उपस्थित होत्या. पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल व्हाईस चेअरमन दिलीप कांबळे, संचालक महेंद्र पारेख यांनी कृष्णा कोबनाक यांचे अभिनंदन केले. संस्था व्यवस्थापक सुजित पोटले, बँक कर्मचारी ज्योती करडे, दर्शना पाटील, कॅशिअर बांद्रे, सुजित पोटले, विवेक गीजे उपस्थित होते.
Check Also
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …