Breaking News

पनवेलमध्ये लाठीकाठी प्रशिक्षण प्रात्यक्षिके; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने पनवेलमध्ये आयोजित प्राचीन युद्धकलेतील लाठीकाठी प्रशिक्षणाचा सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच झाला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रणरागिणींनी या वेळी प्रात्यक्षिक सादर केले. सक्षम, सबळ महिला या प्रगत राष्ट्राचे लक्षण असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आज भारत जगात महासत्ता बनत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासाठी पनवेलमध्येदेखील भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. पनवेलमधील मुलींना-महिलांना स्वसंरक्षणासाठी सज्ज करण्यासाठी नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास पनवेलकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण 200पेक्षा जास्त महिलांनी यात नावनोंदणी केली होती. पनवेलमधील हायवेलगतच्या खुल्या मैदानात झालेल्या सांगता समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका चारूशीला घरत, दर्शना भोईर, मोनिका महानवर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तसेच गुरूनाथ लोंढे, वर्षा प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply