Breaking News

राजेश गाणार ‘भाजप श्री 2022’चा मानकरी

मुरूड ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष मुरूडच्या वतीने रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा मुरूड येथील हिंदू बोर्डिंगच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राजेश चंद्रकांत गाणार (स्थानिक गुन्हा अन्वेषण अलिबाग) अंतिम विजेता ठरला. त्याला भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते भाजप श्री 2022 किताबाने गौरविण्यात आले आहे. स्पर्धेचे आयोजन मुरूड तालुका भाजप उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांनी उत्तमरीत्या केले होते. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष परेश किल्लेकर, ज्येष्ठ नेते अण्णा कंधारे, शहर उपाध्यक्ष भाविक किल्लेकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगदिश घरत, जिल्हा चिटणीस समीर राणे, अल्पसंख्याक सेल सरचिटणीस हनीफ हलडे, सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, हिंदू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप जोशी, संचालक मनोहर गुरव, सुधीर दांडेकर, शैलेश काते, उपाध्यक्ष बाळा भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, महेश मानकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील बेस्ट पोझर म्हणून अक्षय गवाणकर याची निवड करण्यात आली. त्यालाही चषक व रोख रक्कम देण्यात आली. परीक्षक म्हणून परशुराम चव्हाण, प्रभाकर मोहिते, गजानन पाके, राजेश गुप्ते, आशिष खोत, दर्शन जाधव, प्रसाद सावंत, श्याम धाटावकर यांनी काम पहिले.

पर्यटन महोत्सव भरवणार -अ‍ॅड. महेश मोहिते

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते म्हणाले की, तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी तालुका उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांनी उत्तम भूमिका बजावून स्पर्धा घेतली. शारीरिक तंदुरुस्ती ही खूप महत्त्वाची असून युवा वर्गाने व्यायाम हा केलाच पाहिजे. लवकरच आम्ही भाजपतर्फे मुरूडमध्ये पर्यटन महोत्सवसुद्धा भरवणार आहोत. यात सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आदींचा समावेश असेल, ज्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply