नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या 16 ते 20 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यासाठी, शांताबाई रामराव सभागृह सत्याग्रह महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई येथे रविवार दि. 5 मे 2019 रोजी सकाळी 10.30 ते 04.30 वेळात करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्यावतीने केले आहे. संस्थेच्या माजी अध्यक्षा दिवंगत शांताबाई रामराव यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आणि निःशुल्क आहे. या कार्यशाळेत नाष्टा, दुपारी जेवण संस्थेच्या वतीने दिले जाणार असल्याचे या कार्यशाळेचे संयोजक अमरचंद हाडोळतीकर यांनी कळविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये करिअरच्या वाटा शोधत प्रशासकीय सेवा, न्याय व्यवस्था, वैद्यकीय, अवकाश आणि उद्योजकतेमध्ये मोक्याच्या आणि माायाच्या जागा पटकविलेल्या आजी-माजी सन्माननीय मार्गदर्शकाकडून या कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये बौद्धिक चाचणी घेतली जाणार असल्याचे डॉ. जी. के. डोंगरगांवकर यांनी कळविले असून कार्यशाळेत सहभाग होऊ इच्छिणार्या दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण अथवा बसलेल्या आणि करिअरच्या वाटा शोधणार्यांनी प्राचार्य वनिता सूर्यवंशी, सत्याग्रह महाविद्यालय, सुप्पारक भवन, प्लॉट नं. 52, सेक्टर-19, खारघर, नवी मुंबई. भ्रमणध्वनी 8424014827, 9930958025, 9892282015 येथे आपले नाव रविवार, दि. 05 मे 2019 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत नोंदवावे, असे आवहन केले आहे.