Breaking News

दगडाच्या सहाय्याने मारहाण, गुन्हा दाखल

पनवेल : कलंबोली येथे एका 40 वर्षीय इसमाला शिवीगाळी व दमदाटी करून दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष मारुती चौधरी हे रिक्षा परमीटसाठी सोसायटीतर्फे रहिवासी दाखला पाहिजे म्हणून सोसायटीचे अध्यक्ष महादेव किसन कोकरे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर कोकरे व योगेश आबाजी कोळपे व विकास प्रकाश यमगर यांनी कोकरे यांच्या घरी ते नसताना का गेलात, असे बोलून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. या वेळी महादेव कोकरे याने हातातील दगडाने मारून दुखापत केली, तसेच शीतल चौधरी या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांना देखील हाताने मारहाण केली आहे.

– 95 हजाराची चोरी पनवेल : सीआयडीवाला आहे असे सांगून खारघर येथून एका इसमाच्या खिशातील 95 हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे. खारघर पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. विजयकुमार रामसेवक जयस्वाल (वय 49 वर्षे) हे ऑर्डर प्रमाणे फर्निचरचा माल बनवून डिलिव्हरी करण्याचे काम करत आहेत. त्यांनी खारघर येथील फर्निचर उतरवून 95 हजार रुपये त्याबदल्यात घेतले. याच वेळी हायवे ब्रेक हॉटेलजवळ मोटरसायकलवरुन आलेल्या एका इसमाने त्यांना स्वतः सीआयडी असल्याचे सांगून खिशातील 95 हजार रुपये काढून घेतले व तो पळून गेला. खारघर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply