Breaking News

खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

खालापूर : प्रतिनिधी

कोरोनाच्या काळात नऊ महिने बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिल्याने नऊ महिने कोंडून राहिलेल्या नागरिकांनी मुंबई बाहेर पडत देव दर्शन घेण्याचा शनिवारीच बेत आखला तर सलग दोन दिवस सुट्या असल्याने हवा पालटण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या वाहनांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र गाठण्यासाठी एकच गर्दी केली. याचा परिणाम मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली खालापूर टोल नाका समोर दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.

महामार्ग पोलीस आणि बोरघाट पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही. शेवटी वाहतूक पोलिसांनी टोलनाक्यावरील वाहनांच्या लागलेल्या रांगा टोल न घेताच सोडण्याचा निर्णय घेतल्याने पंधरा ते वीस मिनिटांमध्ये टोल नाक्यावरील वाहतूक वाहनांची गर्दी कमी होत सावरोली टोल नाका वाहतुकीसाठी खुला झाला. मुंबईहून पुणे बस कडे जाणार्‍या मार्गीकेवर झालेला खोळंबा दोन ते अडीच तास होता. सकाळी 10 वाजल्यापासून वाहनांची कोंडी सुटल्याने  वाहतूक पूर्ववत झाली.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply