Breaking News

माथेरानच्या विद्यार्थ्यांची रोज बारा किमी पायपीट

कर्जत : बातमीदार

माथेरानमधील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाळा, महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी रोज किमान 12 किलोमीटरची पायपीट करावी लागते. माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरु झाल्यास या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माथेरान या पर्यटन स्थळावर मोटार वाहनांना बंदी आहे, त्यामुळे पायी किंवा घोड्यांच्या सहाय्याने माथेरानमध्ये वाहतूक व्यवस्था करावी लागते. येथील स्मित सखाराम खाडे हा विद्यार्थी कर्जत येथील आयटीआयमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो. त्याला रोज घरापासून सहा किमी. अंतर चालत जाऊन दस्तुरीनाका येथील टॅक्सी स्टॅण्ड गाठावेे लागते. तेथून तो टॅक्सीने नेरळ व रेल्वेने कर्जत येथील आयटीआयमध्ये पोहचतो. तेथील काम पूर्ण करून तो पुन्हा लोकल पकडून नेरळ आणि तेथून टॅक्सीने दस्तुरीनाका  येथे पोहचतो. तेथून सहा किमी.ची पायपीट करून तो घर गाठतो. त्याची ही पायपीट नित्याची झाली आहे.

स्मित खाडे याच्याप्रमाणेच येथील अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज किमान चार किलोमीटर पायी प्रवास करीत असतात. त्यांची पायपीट आणि पाठीवर पुस्तकांचे ओझे लक्षात घेऊन माथेरानमधील हातरिक्षा संघटनेने ई रिक्षा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याला यश आल्यास  या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply