पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संस्कार भारती, उत्तर रायगड जिल्हा, पनवेल समिती आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 19) सायंकाळी 4.30 वाजता गीतांजली हा देशभक्तीपर गीतांचा सुरमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक, अभ्यासक, लेखक चंद्रकांत शहासने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून निशुल्क प्रवेशासाठी सुलक्षणा टिळक (9372904146), अमोल खेर (9820233349), अमोल स्टेशनरी पनवेल येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.