Breaking News

उमरोली येथे लागलेल्या आगीत वखार जळून खाक

कर्जत : बातमीदार

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील उमरोली गावासमोर असलेल्या वखारीला शुक्रवारी (दि. 18) दुपारी आग लागली. त्यात एक टेम्पो तसेच दुचाकी जळून खाक झाली. वखारीमधील सिमेंट पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वखारीच्या मागे असलेल्या माळरानावर प्रथम आग लगली. ही आग नंतर वखारीपर्यंत पोहचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला जात आहे. कर्जत तालुक्यातील उमरोली गावाच्या हद्दीत मोहमद शमी इशाक खान (मुंबई) यांच्या मालकीची वखार आहे. होळीसाठी मालक मोहमद खान हे गुरुवारी मुंबईत गेले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वखारीच्या मागे असलेल्या मोळ्यांना आग लागली आणि त्या आगीचे लोळ वखारीपर्यंत पोहचले. त्यावेळी वखारीमध्ये कोणी नव्हते. या आगीमध्ये  वखारीमधील एक पिकअप गाडी आणि दुचाकी जळून खाक झाली असून वखारीचे छप्पर अर्धवट कोसळले आहे. वखारीमधील लाकडी सेन्ट्ररिंगचे साहित्यदेखील जळून गेले. कर्जत येथून अग्निशमन यंत्रणा पोहचण्याआधी वखारमधील साहित्य जळून गेले होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply