Breaking News

नवीन पनवेलमध्ये साहित्य वसंतोत्सव

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

साहित्य साधना या समूहाच्या वतीने साहित्य वसंतोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेलमधील सिडको उद्यानातील खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग रहिवासी संघाचे अध्यक्ष केशव राणे व पदाधिकारी तसेच रॉयल एज्युकेशन असोसिएशनच्या संस्थापक नाजनीन पालेकर, जाकीर पालेकर आदी उपस्थित होते.

समूहाचे प्रवर्तक शंकर आपटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. यामध्ये स्व. लता मंगेशकर व सिंधुताई सकपाळ यांना शब्दसुमनांजली, व्यक्तिचित्रण, कथा, अलक, ललित, कविता, विडंबनगीत  अशा अनेक साहित्यकृतींचे सादरीकरण ज्येष्ठ आणि नवोदित साहित्यप्रेमीनी केले.

शंकर आपटे व वरदा जोशी यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेखर अंबेकर, तुषार दानवे, सुजाता कुलकर्णी, अपर्णा साठे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. माधव भागवत या युवा कलाकाराने गायकांना तबलासाथ केली.

Check Also

कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

लोकप्रिय व हृदयस्पर्शी कवितांतून श्रोते झाले मंत्रमुग्ध पनवेल ः रामप्रहर वृत्तप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज अर्थात वि.वा. …

Leave a Reply