Breaking News

12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण वेगवान करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची माहिती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 12 ते 14 वयोगटांतील लसीकरणास 16 मार्चपासून प्रारंभ झाला. या वयोगटातील मुलामुलींचेही वेगवान लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

16 मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे, परंतु शहरातील केंद्र वाढवल्यानंतर वेगवान लसीकरण करता येणार आहे. पहिल्या दिवशी  कोविन पोर्टलचा गोंधळ होता. परंतु पालिकेने दुसर्‍याच दिवसापासून सर्व वयोगटांतील लसीकरणाप्रमाणे 12 ते 14 वयोगटातील लसीकरणही सकाळी 9 ते 5 वेळात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेची आता पुढील आठवड्यात जास्तीत जास्त केंद्रे वाढवण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेने सुरुवातीपासूनच लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे 18 वर्षांवरील वयाच्या लसीकरणाचे पहिल्या व दुसर्‍या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट गाठणारी नवी मुंबई महानगरपालिकाही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणातही पालिकेने पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे या वयोगटातील लसीकरण करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे.

नवी मुंबईत पुढील आठवडयात 12 ते 14 वयोगटांतील लसीकरण केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयाबरोबरच  23 नागरी आरोग्य केंद्रे व शाळांमध्येही लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. या वयोगटातील लसमात्राही अधिक प्राप्त करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, असे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Check Also

उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …

Leave a Reply