भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर रेल्वे स्टेशनबाहेरील भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या खारघर मधील कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत रविवारी (दि. 20) या भुयारी मार्गामधील रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात झाली आहे.
खारघर रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गामधील रस्ता खराब झालेला होता. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडी होते तसेच रिक्षा व दोन चाकी वाहनांची खड्ड्यांमुळे पडझड होत होती. त्यामुळे सिडकोने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, जेणेकरून तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही व वाहतूक कोंडीही होणार नाही, असे प्रभाकर घरत यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनात म्हटले होते.