Breaking News

सामाजिक संघटनांनी शासन व लाभार्थ्यांमधील दुवा बनावा

विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती अध्यक्ष भिकू इदाते यांचे आवाहन

अलिबाग ः रामप्रहर वृत्त

केंद्र स्तरावरील विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते हे दि. 16 व 17 मार्च दरम्यान रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. गुरुवारी (दि. 17) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागातील अधिकारी व विविध सामाजिक संघटनाांची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व्यक्तीपर्यंत पोचविण्यासाठी सामाजिक संघटनांनी शासन व लाभार्थ्यांमधील दुवा बनून आपले योगदान द्यावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी सामाजिक संघटनांना केले.

या बैठकीस जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. भरत बास्टेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव व इतर अधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी सर्व उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे स्वागत करुन प्रस्तावना मांडली. अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी या बैठकीमध्ये जात प्रमाणपत्रांची पडताळणी व विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्या कल्याणाकरिता चालविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली.

या वेळी योजना राबविताना येत असलेल्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच रायगड जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात आश्रमशाळांची संख्या वाढविल्यास समाजातील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार शिक्षण घेणे सुकर होईल व खासगी शाळांच्या भरमसाठ शुल्कातून त्यांची सुटका होईल, असेही ते म्हणाले.

भटक्या जमाती व विमुक्त जातींकरिता नवीन योजना

भारत सरकारकडून भटक्या जमाती व विमुक्त जातींकरिता जाहीर झालेल्या नवीन योजनांमध्ये एमपीएससी, यूपीएससी या परिक्षांची तयारी करण्यासाठी विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लोकांना कोचिंग क्लासचा खर्च भारत सरकार करणार आहे. त्यासाठी डएएऊ हे ऑनलाईन वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. तसेच हेल्थ इन्शोरन्स ही एक महत्वाची योजना आहे. या योजनेमध्ये प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत मदत कोणत्याही व्यक्तीस मिळते. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील व्यक्तींना घरकुल योजनेच्या धर्तीवर घरे देण्याची योजना या नव्याने सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply