पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारांच्या वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हा कामगार आघाडी व जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचे समीर चव्हाण यांना देण्यात आले आहे.
मागणी संदर्भातील निवेदन देताना भाजप उत्तर रायगड जिल्हा कामगार आघाडी व जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, समिरा चव्हाण, रवींद्र कोरडे, ज्ञानेश्वर साखरे, चंद्रकांत कडू, मंगेश पाटील आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, रायगड जिल्हा सुरक्षा मंडळामध्ये जवळपास अडीच हजार सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदीत सुरक्षा रक्षकांची पूर्वीच्या वेतनवाढीची मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आलेली आहे. सध्याच्या महागाईचा दर व सुरक्षा रक्षक, अधिकारी यांच्या वेतनामध्ये फार तफावत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक, अधिकारी यांना आपले जीवनमान चालविणे कठीण होत आहे. या संदर्भातील मागणीचा सकारात्मक विचार करून वेतन व भत्त्यांमध्ये 1 जानेवारी 2022पासून सुधारणा करून त्याचा लाभ रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक व अधिकारी यांना देण्यात यावा. या निवेदनाची प्रत राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ, कामगार आयुक्त यांनाही देण्यात आली आहे.
सकारात्मक विचार व्हावा!
मागील वेळी राज्याचे तत्कालीन कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर व कामगार आघाडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे वेतनवाढ झाली होती. त्याचप्रमाणे मागणीचा सकारात्मक विचार करून 1 जानेवारी 2022पासून पुन्हा पगारवाढ व्हावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper