Breaking News

पुलावरील लोखंडी प्लेट सरकल्याने अपघात

पनवेल ः वार्ताहर

वाशी खाडीपूल या ठिकाणी दुचाकीवरून एक जण  सोमवारी (दि. 21) सकाळी कामावर जात असताना पुलावरील एक लोखंडी प्लेट बाजूला सरकल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन चालकाला पोलिसांनी तत्काळ मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाशी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगळेकर यांनी पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन करून स्वतः सोबत पोलीस अंमलदार पाटील यांच्या मदतीने सहाशे किलो वजन असलेली लोखंडी प्लेट पुन्हा त्याच जागेवर व्यवस्थित बसवून वाहतूक सुरळीत केली.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply