सप्तसूत्री कार्यक्रमाद्वारे विविध योजनांचा लाभ
पनवेल : वार्ताहर
पनवेल मधील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमाद्वारे विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त कोकण विभाग, विलास पाटील हे होते तर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते हे लाभ वाटप करण्यात आले. कातकरी जमात ही नामशेष होण्याच्या मार्गावर असुन या जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही सप्तसुत्री आखली आहे. जिल्हाभरात आदिवासींना 31 हजार वेगवेगळे दाखले उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या वेळी सांगितले.
पनवेल तालुक्यात 3300 जातीचे दाखले तयार करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 700 दाखल्यांचे वितरण आज करण्यात आले. तसेच उरण, कर्जत, खालापुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. पनवेल, उरणचा विचार करता 7000 दाखले तयार करण्यात आले आहेत.
-विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल