नागोठणे : प्रतिनिधी
तांत्रिक दुरुस्तीनिमित्त नागोठणे शहराचा विद्युत पुरवठा शुक्रवारी (दि. 3) दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून, या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.