Breaking News

चेन्नईचा दिल्लीवर ‘सुपर’ विजय

चेन्नई : वृत्तसंस्था

धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर 80 धावांनी दमदार विजय मिळवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही, पण त्यानंतर सुरेश रैना आणि फाफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. सुरेश रैना आणि फाफ ड्यू प्लेसिस यांनी संयत फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. फाफच्या रूपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फाफने 41 चेंडूंत 39 धावा केल्या. त्यानंतर सुरेश रैनाच्या रूपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रैनाने 37 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 59 धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजच्या सामन्यात एक वेगळाच किस्सा पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्या वेळी सुरेश रैनाने चक्क पीचवर पडून चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.अक्षर पटेलच्या सहाव्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रैना एक फटका मारायला गेला, पण त्या वेळी त्याचा तोल योग्य न राहिल्यामुळे तो पीचवर पडला, पण त्याने जो फटका मारला तो थेट सीमारेषेवर गेला आणि रैनाला चौकार मिळाला. रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही. पण त्यानंतर सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. सुरेश रैना आणि फाफ ड्यू प्लेसिस यांनी संयत फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. फाफच्या रूपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फाफने 41 चेंडूंत 39 धावा केल्या. त्यानंतर सुरेश रैनाच्या रूपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रैनाने 37 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 59 धावा केल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply