Breaking News

कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी

पनवेल ः वार्ताहर

कळंबोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी प्रभाग समिती ब सभापती प्रमिला पाटील यांनी केली आहे. गुरुवारी (दि. 24) पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व सभागृह नेते परेश ठाकूर यांना त्यांनी निवदेन दिले.

छत्रपती शिवाजी महाराज हे हे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. त्यांचे कार्य आजही तरुणांसाठी स्फूर्तीदायकच आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक कळंबोली परिसरात उभारल्यास भावी पिढीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले पराक्रमी व परोपकारी संस्कार होतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवदेन देतेवेळी महापौर कविता चौतमल, उपमहापौर सिताताई पाटील, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक हरेश  केणी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply