Breaking News

राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 14

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री
8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

—————   ————————————————   ————————————

1. भारतातील सर्व विमान कंपन्यांकडे सध्या किती विमाने आहेत?
अ.) 1010 आ.) 710 इ.) 510 ई.) 310
2. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडेचबंगळूर येथे रिझर्व बँक इनोवेशन हबची स्थापना कोणत्या उद्देश्याने केली आहे?
अ.) डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी आ.) बँकेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी
इ.) आर्थिक सेवा आणि उत्पादने गरीबांपर्यंत पोचण्यासाठी ई.) क्रेडीट कार्डचा वापर वाढण्यासाठी
3. भारताचा हा शेजारी देश सध्या अतिशय गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.
अ.) बांगलादेश आ.) नेपाळ इ.) भूतान ई.) श्रीलंका

———————–  ———————————–   —————————————

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी
अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.
…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply