Breaking News

मिस्टर युनिव्हर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचे तीन बॉडी बिल्डर करणार भारताचे प्रतिनिधित्व

अलिबाग : प्रतिनिधी
सध्या अलिबाग तालुक्यातील अनेक तरुण-तरुणी आपले नाव सातासमुद्रपार घेऊन जात आहेत. त्यात आता तालुक्यातील तीन बॉडीबिल्डर्सची आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने अलिबागकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे येथे होणार्‍या 15 ते 17 एप्रिलदरम्यान मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, ऋषिकेश म्हात्रे आणि दीपक राऊळ या तीन बॉडी बिल्डर्सना प्राप्त झाली आहे. तसे पत्र बॉडीबिल्डर अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन रायगड ऑरगनायझर सेक्रेटरी-महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन जनरल सेक्रेटरी दिनेश शेळके यांनी पाठविले आहे.
ग्रामीण भागात राहणारे व घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी स्वताला सिद्ध करीत जयेंद्र मयेकर यांनी चार वेळा मिस्टर इंडिया किताब पटकाविला असून एकदा मिस्टर आशिया किताबही मिळविलेला आहे. आजपर्यंत त्यांनी विविध प्रकारचे 22 किताब पटकाविले आहेत. ते जिल्ह्यातील युवकांना शरीरशौष्ठव स्पर्धेसाठी तयार करण्याचे काम करीत आहेत.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा परिषद महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन रायगड संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशनतर्फे मिस्टर युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply