Breaking News

म्हसळा ग्रामपंचायत हद्दीत जंतुनाशक फवारणी

म्हसळा ः प्रतिनिधी

म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामविकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयाने तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींतील सर्व महसुली गावे, वाड्या वस्त्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. आंबेत, रोहिणी, आडी महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव बु., पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव खुर्द, कणघर, लेप, कोळे, नेवरूळ, जांभूळ, घूम, साळविंडे, मांदाटणे, ठाकरोली, कोळवट, केलटे, तोंडसुरे, घोणसे, खामगाव, कुडगाव, संदेरी, लीपणी वावे, चिखलप, तोराडी, पांगळोली, वारळ, फळसप, तुरुंबाडी, काळसुरी, देवघर या ग्रामपंचायतींतून फवारणी झाल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र निर्जंतुकीकरणासाठी फवारणी झाली तरी म्हसळा नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील पूर्ण भागात अद्यापही फवारणी झाली नसल्याने शहरातील नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply