Breaking News

राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागाने शाळांना उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या असताना, गुरुवारी शिक्षण विभागानेच उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 2 मेपासून ते 12 जूनपर्यंत ही सुटी असणार आहे. यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही, या कल्पनेने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सुटीची मागणी केली होती. उन्हाळ्याची दीर्घ सुटी कमी करून या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्यावेळेस देता येणार आहेत. या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकार्‍यांना असणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिलेत. दरम्यान, कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply