Breaking News

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित ‘मोदी स्टोरी’ पोर्टल लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘मोदी स्टोरी’ नावाचे एक पोर्टल तयार करण्यात आलेय. यामध्ये मोदींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना भेटलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्या जीवनातील गोष्टींचा समावेश असेल. ‘मोदी स्टोरी’ हे पोर्टल आज रविवारी (दि. 3) लाँच करण्यात आलेय.

मोदी स्टोरी पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, मोदी स्टोरी पोर्टलची घोषणा हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत नरेंद्र मोदींच्या जीवनाशी संबंधित रंजक कथा सांगितल्या जातील. नरेंद्र मोदींना जवळून पाहिलेल्या व्यक्तींकडून मोदींचे किस्से त्यांच्या जीवनातील माहित नसलेल्या गोष्टी एकत्र आणण्याचा त्यांचा उद्देश आहे. कोणीही व्हिडिओ, ऑडिओ किंवा मजकूराच्या स्वरूपात यामध्ये योगदान देऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. महात्मा गांधींच्या नात सुमित्रा गांधी कुलकर्णी यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

नव्या भारताची निर्मिती ही सामान्य लोकांच्या एकत्र येण्याची कहाणी आहे, महानतेची आकांक्षा बाळगून, ‘आम्ही लोक’ या भावनेने असे अनेक लोक आहेत, ज्यांनी मोदींच्या जीवनाची, त्यांच्या हेतूची झलक पाहिली आहे. मोदी स्टोरी अशा आवाजांबद्दल आहे, असे पोर्टलच्या बायोमध्ये म्हटलेय.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग, अभिनेता आणि राजकारणी मनोज तिवारी, माजी वित्त सचिव हसमुख अधिया आणि अध्यात्मिक नेते स्वामी अवधेशानंद गिरी यांच्यासह अनेक व्यक्तींनी या कथासंग्रहात योगदान दिले आहे.

मोदी स्टोरी ट्विटर हँडलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऑलिंपियन नीरज चोप्रा म्हणाला की, आम्ही भारताच्या पंतप्रधानांना भेटत आहोत, असे आम्हाला वाटले नाही. ते प्रत्येक खेळाडूशी बोलले आणि वैयक्तिकरित्या आमच्याबद्दल जाणून घेतले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून क्रीडा क्षेत्रात खूप बदल झाले आहेत, असे नीरज चोप्राने सांगितले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply