Breaking News

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : रविशेठ

पाली : रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्यातील झाप- आपटवणे-भावशेत या रस्त्याच्या  दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. आगामी काळात मतदार संघातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपचे रायगड जिल्हा चिटणीस राजेश मपारा, चंद्रकांत घोसाळकर, आपटवणे सरपंच शरद चोरगे, आतोणे सरपंच रोहन दगडे, शिराष सकपाळ, जितेंद्र केळकर, धनराज सागळे, वैशाली मपारा, सागर मोरे, अरविंद  फणसे, अरुणा साठे, आरती भातखंडे यांच्यासह ठेकेदार आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

झाप-आपटवणे-भावशेत हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून  दुरुस्तीपासून वंचित होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार रवीशेठ पाटील यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला मंजूर मिळाली आहे. या सात किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरूस्तीसाठी व दोन पुलासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन कोटी 12 लाख मंजूर करण्यात आले आहेत.

विकास कामांसाठी निधी कमी पडला तर थेट केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करू, पण या पाच वर्षात पेण सुधागड रोहा या विधानसभा मतदार संघ कायापालट करण्यात येईल.

-रवींद्र पाटील, आमदार, पेण विधानसभा मतदारसंघ

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply