Breaking News

नवी मुंबईतील अनेक सोसायट्यांमध्ये कचरापेटी नसल्याने कचर्‍याचे ढीग

नवी मुंबई ः प्रतिनिधी

कोरोनापूर्व काळात सोसायट्यांमधील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करा, असे न केल्यास हा कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा नवी मुंबई महापालिकेने शहरवासीयांना नोटिसीद्वारे दिला होता, मात्र या कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही कचरापेटी दिली नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. बहुतांश सोसाट्यांजवळ यामुळे कचर्‍याचे ढीग पहावयास मिळत आहेत. शहरातील कचर्‍याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही घनकचरा विभागाद्वारे प्रभावीपणे सुरू करण्यात आली होती. त्यासंदर्भात अनेक सोसायट्यांना पत्रकेही वाटण्यात आली होती. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओला-सुका कचरा वर्गीकरण सुरू आहे, मात्र नवी मुंबई शहरातील बहुतांश सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरणासाठी अनेक वेळा मागणी करूनही कचरापेटी महापालिकेने पुरविले नाहीत. त्यामुळे विविध सोसायट्यांबाहेर, रस्त्यावर कचरा पाहायला मिळत आहे.

कोरोनाकाळात आम्ही ओला आणि सुका कचरा वर्गीकरण केले आहे. मधल्या लॉकडाऊन काळात ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करता आले नाही. बर्‍याच ठिकाणी कचरापेट्या पुरविण्यात आल्या आहेत. तरी पाहणी करून तत्काळ कचरापेट्या पुरविल्या जातील.

– बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply