मान्यवरांची उपस्थिती; विविध कार्यक्रमांची रेलचेल
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जिवाचीही पर्वा न करता सेवा कार्य करणार्या कोरोना योद्धांचा सन्मान सोनिया महिला मंडळाने केला आहे. मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. 5) आयोजित करून तब्बल 87 कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला पनवले महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनी सोनिया महिला मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.
सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतुन एक पाऊल उचलत कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासह अनेकांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात सेवाकार्य करून नागरिकांना मदत केली. अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. हा सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आल होता.
या वेळी मुकेश म्युझीकल मेलोडी यांच्या हिंदी गितांच्या बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, वर्षा प्रशांत ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक, कामगार नेते रवी नाईक, आदिती मराठे, सारिका मोरे, चंद्रकांत मंजुळे, मधुकर उरणकर, दिनेश केकाणे, श्रद्धा केकाणे, राहुल केकाणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते केदार भगत, सोनिया महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहासिनी केकाणे, उपाध्यक्षा अंजली इनामदार, सरचिटणीस तथा माजी नगरसेविका निता माळी, चिटणीस निता मंजुळे, अस्मिता गोसावी, श्वेता म्हात्रे आदी पदाधिकारी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.