रोहे : प्रतिनिधी
रोहा-मुरुड क्षत्रिय मराठा समाज आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त वतीने येथील भाटे सार्वजनिक वाचनालयात रविवारी (दि. 20) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 85 जणांनी रक्तदान केले. क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष काशीनाथ सावंत, सेक्रेटरी संदिप सावंत, सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष अप्पा देशमुख, मराठा समाज अध्यक्ष अमित उकडे, मराठा महासंघ तालुका अध्यक्ष लिलाधर देशमुख, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी रोहीत उतेकर, अनिकेत पार्टे, किशोर तावडे, सचिन देवकर, निलेश शिर्के आदीं या वेळी उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन व मराठा समाज बांधवांनी परिश्रम घेतले.