पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 मधील विविध विकासकामांची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) केली. जनकल्याण बँक समोरील रस्ता, गावदेवी पाडा, म्हात्रे हॉस्पिटल आणि तथास्तु हॉल या परिसरामध्ये सुरू असलेल्या रस्ते आणि नाल्यांच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली आणि संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप नेते जितेंद्र वाघमारे, प्रभाग क्रमांक 19अध्यक्ष पवन सोनी, प्रशांत शेट्टेे, शहर अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंखे, जाने यांच्यासह आदी उपस्थित होते.