Breaking News

पागोट्यात घंटागाडी, पाणीपुरवठा करणार्या ट्रॉलीचे लोकार्पण

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी व पाणी पुरवठा करणारी ट्रॉली आणण्यात आली आहे. या ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. 24) ग्राम सुधार मंडळ पागोटे गाव विकास अध्यक्ष आशिष तांडेल, सरपंच मिलींद तांडेल यांच्या उपस्थितीत झाला.

या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी सरपंच योगेश पाटील, महेश पाटील, विजय पाटील, ग्राम सुधार मंडळ पागोटे गावचे उपाध्यक्ष निरज पाटील, खजिनदार मनिष पाटील, टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, नितीन पाटील, भालचंद्र तांडेल, ग्रामपंचायत उपसरपंच हर्षाली पाटील, सदस्य सुमित पाटील, समीर पाटील, प्रदीप पाटील, कामिनी पाटील, रश्मी म्हात्रे, वनिता पाटील, हर्षाली पाटील, मीता पंडित आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत फंडातून घंटागाडी व पाणीपुरवठा करणारी ट्रॉली पागोटे गावासाठी आणण्यात आल्याने उपस्थित ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार व्यक्त केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply