पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कामोठे या विद्यालयाला महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक क्रीडा अनुदान प्राप्त झाले आहे.
विद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वप्नाली म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना विविध क्रिडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यास उद्युक्त केले. त्यानुसार जवळपास 50 क्रीडा प्रकारामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, केवळ सहभागच नव्हे तर ‘जिल्हास्तर व राज्यस्तर’ या स्तरावर विविध बक्षिसेही मिळवली. वयोगट अनुक्रमे 14, 17 व 19 अशा स्तरावर भाग घेऊन प्राविण्य मिळवले.
हा क्रिडा प्राविण्याचा चढता आलेख लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली व विद्यालयास (रोख एक लाख पंचवीस हजार तीनशे नऊ) रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान दिले.
खेळाची उत्तम फळी तयार व्हावी तसेच या खेळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत या हेतूने प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. अनुदानाच्या रकमेमधून क्रिडा साहित्य क्रीडा गणवेश व क्रिडांगण दुरुस्ती या गोष्टी साध्य होणार आहेत.
या वेळी ‘रयत’चे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे माजी विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर आदींनी प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे यांचे अभिनंदन केले. या वेळी अविनाश कुलकर्णी, ‘रयत’चे पीआरओ बाळासाहेब कारंडे, संतोष गुजर, क्रिडा शिक्षक हितेश कडू, रूपाली जोगदंड व पल्लवी बागेकरी आदी सहभागी होते.
यापुढेही अशीच कामगिरी करून अधिकाधिक विद्यार्थीसहभागी होतील, अशी ग्वाही विद्यालयाच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे यांनी दिली.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper