पनवेल : प्रतिनिधी
जागतिक स्वमग्नता जागृती दिनाच्या निमित्ताने नुकतेच पनवेल महापालिका, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आणि शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या वतीने स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 25 मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली.
या वेळी पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सचिन संकटात, शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरचे पांडुरंग आलुरकर, डॉ.ज्योती गुरव उपस्थित होते. तज्ज्ञांनी या मुलांची तपासणी करून पालकांना मार्गदशन केले तसेच या वेळी या मुलांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
ऑटिझम आजाराविषयी समाजामध्ये पुरेशी माहिती किंवा जनजागृती झालेली नाही. यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने ऑटिझमविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, ऑटिझमविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत म्हणून 2 एप्रिल हा दिवस ‘जागतिक ऑटिझम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला.