कोटगाव ग्रामस्थ मंडळ व प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था
उरण : वार्ताहर
येथील उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था यांच्या वतीने सोमवार (दि. 26) जुलै रोजी महाड येथील तहसीलदार सुरेश कासिंद यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू स्वाधीन केल्या.
महाड, पोलादपूर, चिपळूण, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. प्रकल्पग्रस्तांचे अश्रू पुसण्यात आपलाही खारीचा वाटा असावा या भूमिकेतून उरण तालुक्यातील कोटगाव ग्रामस्थ मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात आली. एक हात मदतीचा या उद्देशाने मदत करीत आहेत.
मदत म्हणून पूरग्रस्तांसाठी 260 पिण्याच्या बाटल्या, 10 बॉक्स बिस्किटे, 100 पाकीट मेणबत्त्या या वस्तू देण्यात आल्या. यावेळी उरण कोटगाव ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निलेश भोईर, कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था अध्यक्ष नवनीत भोईर, कार्याध्यक्ष निलेश भोईर, उपाध्यक्ष कृष्णा जोशी, सचिव सुनील भोईर, सहसचिव हेमदास गोवारी, खजिनदार सुरज पाटील, सहखजिनदार भालचंद्र भोईर, सदस्य दीपक भोईर, महेश भोईर, प्रकाश पाटील, नित्यानंद भोईर, सुभाष भोईर, सुनील पाटील, विश्वास पाटील, दिलीप कोळी, अजित भोईर, दीपक भोम्बले, देवेंद्र शिंदे, सल्लगार माणिक पाटील, तुकाराम कोळी, हरिचंद्र भोईर, देविदास गोवारी, मोरेश्वर भोईर, रामकृष्ण भोईर, विजय पाटील, परशुराम भोईर आदी उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था
उरण : वार्ताहर
महाड येथील पूरग्रस्त नागरिकांची समस्या, व्यथा लक्षात घेता. महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, उरणतर्फे महाड येथील कोंडीवते ग्रामपंचायत, तसेच नागलवाडी फाटा येथे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पूरग्रस्त नागरिकांच्या घरांना भेटी देत, त्यांच्या दुःख वेदना समजावून घेऊन पूरग्रस्त नागरिकांना वस्तू वाटप करण्यात आले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, उरणचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, खजिनदार सुरज पवार, संपर्क प्रमुख ओमकार म्हात्रे, आकाश पवार, नितेश पवार, सुविध म्हात्रे, साहिल म्हात्रे, हेमंत ठाकूर, इंद्रजित पवार, अभिजित भोईर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पूरग्रस्तांना सामानाचे प्रत्येकी एक किट देण्यात आले. एका किटमध्ये गहू, तांदूळ, इतर अन्नधान्य, कपड्याचे साबण, अंघोळीचे साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, पाणी बॉटल, चादर, बेडशीट, सतरंजी, कपडे, टॉवेल, बिस्कीट, फरसाण, साखर, चहापत्ती यासह इतर जीवनाश्यक वस्तूंचा समावेश होता.
कोंडीवते ग्रामपंचायतचे सरपंच सुनील डाऊर, उपसरपंच राजाराम शिंदे, पोलीस पाटील धोंडीराम दिघे, माजी सरपंच पांडुरंग पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ सावंत आदी यावेळी उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, उरणच्या कार्याचे कौतुक करत सर्वांनी त्यांचे आभार मानले.
तालुक्यातील आदिवासींना मदतीचा हात
उरण : वार्ताहर
शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पुनाडे वाडी, जांभूळपाडा वाडी, जासई वाडी येथील कातकरी वाडीवर धान्यवाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षक वर्गाने अगदी पद्धतशीरपणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली.
या वेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडीवर सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर व उरण सामाजिक संस्था यांच्याकडून देखील धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चंदा नारायण वाघमारे या महिलेचे घर कोसळून सर्व सामानाची नासधूस झाल्याने ती अतिशय टेन्शनमध्ये होती, परंतु उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आधारस्तंभ प्रा. राजेंद्र मढवी आणि संतोष पवार यांनी तिला समजावून धीर दिला, तर प्रमोद ठाकूर यांनी तिला जसे हवे तसे घर बांधून देण्याची जबाबदारी घेतली.
यावेळी तहसीलदारांच्या आदेशाने पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात पाठवला आहे. तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणवरून प्रकल्प अधिकारी देखील स्वतः या घटनेची तपासणी करण्यासाठी येणार आहेत. बेल वाडी येथील सर्व कुटुंबांना भेटण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, प्रमोद ठाकूर, कार्यकर्ता हर्ष पवार, खावटी योजनेचे उरण तालुका प्रमुख अप्पासो मोरे, दत्ता पाटील, खंडू पिचड, भैरू जाधव, सचिन माने उपस्थित होते.