Breaking News

चाकू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार

पनवेल महानगरपालिकेकडून पनवेल एसटी स्टॅण्ड परिसरातील लक्ष्मी वसाहत या ठिकाणी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असताना आरोपी किशोर काळू राममोकल (वय 31) याने शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान शरीरास इजा होईल असे घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना आरोपी याने सदर आदेशाचा भंग करून चाकू जवळ बाळगला होता.

  • चारचाकी गाडीची चोरी

पनवेल : बातमीदार

खांदेश्वर रेल्वेस्टेशन येथील रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या 70 हजार रुपये किमतीच्या चारचाकी गाडीची अज्ञात इसमांनी चोरी केली आहे. कामोठे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलबिर सिंग चंडोक (वय 49 वर्षे) हे खांदा कॉलनी येथे राहत असून त्यांनी त्यांची ह्युंदाई अँसेन्ट कार क्र. एमएच 01 एएच 1164 ही कार खांदेश्वर रेल्वेस्टेशन समोरील रोडवर पार्क करून ते मुंबई येथे लोकल ट्रेनने निघून गेले. या कारची चोरी करण्यात आली आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply