पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 8) 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, प्रत्येकी 361 नवे पॉझिटिव्ह आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, पेण व अलिबाग प्रत्येकी दोन, तसेच मुरूड, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 156, ग्रामीण 52) तालुक्यात 208, पेण 29, महाड 24, खालापूर 22, रोहा 21, अलिबाग 17, माणगाव 13, कर्जत 11, उरण नऊ, मुरूड व श्रीवर्धन प्रत्येकी तीन आणि पोलादपूर तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 18,137 आणि मृतांची संख्या 490 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14,378 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3269 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper