Breaking News

वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना मदत

पुनाडे : रामप्रहर वृत्त

सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या सौभाग्यवती रुपाली म्हात्रे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना जीवनावश्यक कपड्यांचे वाटप व नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप केले.

वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाजापुढे एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. पार्टी, अथवा भरपूर पैसे खर्च करून वाढदिवस साजरा न करता त्यांनी आदिवासी बांधव की ज्यांना कपडेदेखील खरेदी करता येत नाही, अशांना जीवनावश्यक कपड्यांचे वाटप करून रुपाली म्हात्रे यांनी आनंद देण्याचे काम केले आहे. या वाटपावेळी सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, सुयश क्लासेस आवरेचे अध्यक्ष निवास गावंड, रुपाली म्हात्रे, रोहित पाटील, धनेशा पाटील, रिया म्हात्रे, पुनाडे आदिवसी वाडीवरील बांधवआदी उपस्थित होते. अशाप्रकारे आदिवासी बांधवांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.

Check Also

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९वी जयंती …

Leave a Reply