पनवेल ः प्रतिनिधी
शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने गेल्या 18 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदा ही 19 वी स्पर्धा आहे. राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस 75 हजार रुपये, व्दितीय क्रमाकांस 35 हजार तर ततीय क्रमाकांस 20 हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कष्ट कथेसाठी 07 हजार रूपये, उत्कष्ट कविता व उत्कष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी 2500 रूपये, उत्कृष्ट विशेषांकास 05 हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सवोत्कष्ट अंकास 7500 रूपये व सन्मानचिन्ह तसेच रायगड जिल्हयातून प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास 30 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 15 हजार रूपये आणि ततीय क्रमाकांस 7 हजार 500 रूपये, दोन उत्तेजनार्थ व सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाभळे व संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे.