Breaking News

बलात्कार पीडितेने केलेल्या आरोपांची जरूर चौकशी करा

भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे आव्हान

मुंबई: प्रतिनिधी

बलात्कार पीडितेने आपल्यावर केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत असे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिले.

चित्रा  वाघ यांनी यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. त्यांनी सांगितले, 16 फेब्रुवारी रोजी सदर तरुणीने आपल्याला दूरध्वनी केला. त्यावेळी आपण राज्याबाहेर होते. राज्यात परतल्यानंतर दोन ते तीन  दिवसांनी पुण्यात पीडित तरुणीची आपली भेट झाली. या तरुणीने आपल्याला तिच्यावर 2017 पासून झालेल्या अत्याचारांबाबत सांगितले. त्या पीडितेने तिच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात झालेल्या उपचारांबाबतची माहितीही कागदपत्रांसह आपल्याला दिली. हे पुरावे पाहून आपण त्या तरुणीसाठी आवाज उठविण्याचे ठरवले. पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह राज्याच्या गृहमंत्र्यांनाही या तरुणीवरील अत्याचारांची माहिती कळवली. ती तरुणी एकटी लढत असून आपण तिला साथ दिली पाहिजे या भावनेने आपण तिच्यासाठी लढण्याचे ठरवले. मुंबईत प्रसार माध्यमांपुढे त्या पीडितेला आणून तिची कहाणी ऐकवायला लावली. हे करताना एका महिलेला न्याय देण्याची आपली भूमिका होती. ही आपली चूक असेल तर ती मला कबूल आहे.

सदर तरुणीने कोणकोणते संदेश मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाठवले याची माहितीही वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की, आता पीडितेने कोणत्या हेतूने आपल्यावर आरोप केले आहेत हे मला ठाऊक नाही. ज्यावेळी ही तरुणी न्याय मागत होती त्यावेळी तिच्या मदतीस कोणीही आले नाही. आता तिने माझ्यावर आरोप केल्यानंतर सर्वजण माझ्या विरोधात पीडितेच्या बाजूने बोलत आहेत. या आरोपांबद्दल आपण पीडितेला दोष देणार नाही.  तरुणीच्या आरोपाची राज्य सरकारने हव्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी.   या चौकशीतून सत्य बाहेर यावे आणि पीडितेला न्याय मिळावा अशीच आपली भावना असल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply