Breaking News

खराब हवामानामुळे आंबा उत्पादन घटण्याची भीती

मुरुड ः प्रतिनिधी

यंदा पडलेली थंडी आंबा पीक उत्पादकांना दिलासा देणारी ठरणार तसेच यंदाचे आंब्याचे पीक निश्चितच बागायतदारांचा उत्साह टिकवणार अशी शक्यता झाडांना आलेल्या मोहरावरून व्यक्त केली जात असतांना तापमानात प्रतिकूल बदल झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडला आहे. मुरूड तालुक्यात एक हजार 590 हेक्टर क्षेत्रावर हापूस आंबा पिकाची लागवड असली तरी उत्पादनक्षम क्षेत्र हे एक हजार 510 हेक्टर आहे. त्यातून 2020 मधील निसर्ग चक्रीवादळामुळे 629  हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. शासनाच्या मनरेगा योजनेतून दरवर्षी 15 ते 20 हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीसाठी येत असून अंतर्गत मशागतीसाठी तीन वर्षासाठी हेक्टरी 46 हजार अनुदान दिले जाते. याखेरीज प्रत्येक झाडापाठी 60 रु. चा विमा हप्त्यासाठी शासनच खर्च करते.खारअंबोलीचे शेतकरी मनोज लक्ष्मण कमाने म्हणाले की, आंबा मोहोर चांगला असला, तरी यंदा आंबा उशिरा मिळेल तसेच ढगाळ वातावरणामुळे बुरशी वा तुडतुडा, करपा रोग पडून मोहोर गळू शकतो. अवकाळी पाऊस कोसळला तर मोठे नुकसान संभवते.

गेल्या 15 दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे आंबा मोहोराचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अर्थात यापूर्वीच आंबा मोहोर संरक्षण कँप तालुक्यात घेतले आहेत. बुरशीनाशक, कीडनाशकांचा योग्य वेळी वापर केला, तर भुरीसदृष्य रोगापासून बचाव होऊ शकतो.

-मनीषा भुजबळ, कृषी अधिकारी, मुरूड

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply