नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
शहरात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या मात्राचे लसीकरण आतापर्यंत 75 टक्केपर्यंत झाले असून बुधवारपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह नागरी आरोग्य केंद्रांसह 208 शाळांमध्ये यासाठी पालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. 18 वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसर्या मात्रचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण सुरू झाल्यानंतर वेगवान लसीकरण झाले. यासाठी पालिकेच्या रुग्णालयांसह नागरी आरोग्य केंद्रे व 211 शाळांमध्ये लसीकरण करीत आतापर्यंत 35,260 मुलांना पहिली लस मात्रा देण्यात आली आहे. हे प्रमाण टक्केवारीत 74.59 टक्के इतके आहे. पालिका प्रशासनाकडून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. पालिकेच्या नेरुळ, ऐरोली, वाशी, तुर्भे या रुग्णांलयांसह कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो सेंटर, 23 नागरी आरोग्य केंद्रावर हे लसीकरण करण्यात येणार आहे.
शहरातील 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना दुसरी लसमात्रा दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात शाळांमध्येही या वयोगटातील लसीकरणासाठी नियोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दुसर्या लसमात्रेसाठी देखील 208 शाळांमध्ये लसमात्रा दिली जाणार आहे.
– डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, नवी मुंबई महापालिका