Breaking News

घारापुरी बेटाबद्दल मिळणार इत्थंभूत माहिती

28 स्थानिक युवकांना लोकल गाईडची ओळखपत्रे

उरण ः रामप्रहर वृत्त

घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून लेणी परिसरात खासगी सुरक्षारक्षक म्हणून तीन, तर बेटावर पर्यटकांना माहिती करून देण्याचे काम करणार्‍या 28 स्थानिक युवकांना लोकल गाईडची ओळखपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना या लेण्यांबाबत इत्थंभूत माहिती मिळणार आहे.

उरण तालुक्यातील घारापुरी लेणी या जागतिक स्तरावर आकर्षणाचा विषय असून याठिकाणी कायमच पर्यटकांची वर्दळ असलेली पाहायला मिळते. या ठिकाणी कायमस्वरूपी वीज उपलब्ध व्हावी यासाठी उरण येथील भाजप आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरावा करून न्हावा येथून समुद्रातून सबमरिन पद्धतीची वीजवाहिनी टाकून घारापुरीत कामयस्वरूपी वीजपुरवठा करण्यात आला. बुधवारी घारापुरीतील लोकल गाईड म्हणून व्यवसाय करणार्‍या 28 युवकांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. सर्व गाईड बेटाच्या इतिहासाबद्दल एकाच प्रकारची अधिकृत माहिती पर्यटकांना देतील, यासाठी लवकरच याबाबत भारतीय पुरातत्त्व विभाग, भारतीय पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.

सुरक्षारक्षक म्हणून स्थानिकांना संधी

घारापुरी लेण्यांची देखरेख व सुरक्षेचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाने एसआयएस सिक्युरिटी या खासगी कंपनीला दिले आहे. सुरक्षा रक्षक म्हणून स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी चार वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर मंगळवारी तीन स्थानिक युवकांना सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply