Breaking News

विविध नागरी कामांसंदर्भात मनपा आयुक्तांची अधिकार्‍यांसोबत बैठक

पनवेल : प्रतिनिधी

तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, माता बाल संगोपन केंद्र, क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, सोलार पॅनेल, नित्यानंद रस्त्याचे रूंदीकरण, नव्याने बांधण्यात येणार्‍या दोन स्मशानभूमी अशी सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेगाने कामास लागण्याच्या सूचना आयुक्तांनी गुरुवारी (दि. 13) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत संबधित अधिकार्‍यांना दिल्या. वाहतूक विभाग नव्याने सुरू करण्यासाठी त्या अंतर्गत येणारे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्याच्या दृष्टीने संबधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. पनवेल शहर, तसेच महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांमुळे रस्त्यांवर होणारी गर्दी, वाहतुकीची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणार्‍या उपाययोजनांवर या वेळी चर्चा करण्यात आली. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यामातून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याबाबतीत या वेळी चर्चा करण्यात आली. सुरुवातीस पूर्वप्राथमिक शाळा सुरू करणे, तसेच टप्प्याटप्प्याने पुढील वर्ग सुरू करण्यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी शिक्षण विभागास दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, तसेच सर्व विभागप्रमुख, खाते प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी साता समुद्रापार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज …

Leave a Reply