Breaking News

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची जोरदार टीका

मुंबई : प्रतिनिधी

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर, आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयनाक आगीच्या घटनेत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या भयानक घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. विरारमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘सुसाईट डेस्टिनेशनची फुशारकी मारणार्‍या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालेय! मृतांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,’ असे दरेकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था राम भरोसे आहे. भंडारा, भांडूप, नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. कोरोनापेक्षा सरकारी मुर्दाडपणामुळे अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे. याचबरोबर राज्य सरकार आता तरी जागे व्हा! नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे राज्य सरकार ‘जबाबदार’ आहे, असेदेखील दरेकर म्हणाले आहेत. विरार येथील विजय वल्लभ कोविड केअर रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त अतिदक्षता विभागाची तातडीने पाहणी केली. अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नयेत याची आरोग्य विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे, असे दरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बोलून दाखवले आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणार्‍या या रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर ही आग लागली होती. या वेळी अतिदक्षता विभागात 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.दरम्यान, नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील टँकरमधून ऑक्सिजन गळतीमुळे बुधवारी 24 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. अचानक टँकरमधून ऑक्सिजन गळतीमुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात धुराचा लोट उठला. मृत व्यक्तींच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटना होत आहेत आणि या दुर्घटनांमध्ये निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply