महाड ः प्रतिनिधी
वेदा जनजागृती मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक धाव शहीदांसाठी ही हाफ मॅरेथॉन आणि राजमाता महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या बक्षीस वितरण समारंभास पद्मश्री पुरस्काराने सन्मानित महाडचे प्रसिद्ध डॉ. हिम्मतराव बावस्कर तथा नारायण देशमुख, रायगडभूषण सुरेश महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय सावंत, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, ‘बार्टी’चे जमदाडे, प्रा. विश्वास पाटील, राजू देशमुख, संस्थापक अध्यक्ष डॉ. दिगंबर गीते आदी उपस्थित होते. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या पाच किलोमीटर गटात प्रथम क्रमांक ऋतुराज राजेश घाणेकर, द्वितीय शिवम राजेश राजिवडे, तृतीय वैभव विनोद बने, तीन किलोमीटर गटात प्रथम क्रमांक सुरज प्रभाकर शिगवण, व्दितीय तुषार अनिल वेचावडे, तृतीय शंतनू निवृत्ती भुवड, महिलांमध्ये तीन किलोमीटर गटात प्रथम क्रमांक निता राजूदास पवार, व्दितीय गायत्री सुधीर बोरगावकर, तृतीय संगीता बाळासाहेब बारगजे, चौथा मनीषा आकाश पवनालकर, किशोरी तीन किमी गटात प्रथम क्रमांक अमृता राजेंद्र दरेकर, द्वितीय सपना सुनील माने, तृतीय सलोनी गोविंद किर्जत, तसेच चंद्रकांत पांडुरंग साळावकर, निलेश केशव कावळे, महेश शिंदे, मंगेश नगरकर, नाना झंझाड, आराध्य अंबोणकर यांचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.