Breaking News

आजिवलीत माती उत्खनन सुरूच

खालापूर ः खालापुरात खोपोली-पेण मार्गावरील आजिवली गावाजवळ नव्याने निर्माण होणार्‍या इंडोस्पेस कंपनीच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती उत्खननचे काम सुरू असताना डम्परच्या वाहतुकीने हवेत धुरळा उडत आहे. महिनाभर हे काम सुरू असताना हवेत धुरळा होत असल्याने परिसरातील नागरिकांना दम्यासारखा श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे, तर हिवतापसारखा आजार वाढू लागल्याने माती भरावाचे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली जात आहे. परिसरातील नागरिक लवकरच खालापूर तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.

पेणमध्ये रमजान ईद उत्साहात

पेण : पेणमध्ये मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. यावेळी पेणमधील मशिदीवर मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 6 मेपासून या रमजान ईदच्या पवित्र सणाला सुरूवात झाली होती. महिनाभर चालणारा उपवास आणि नमाज करून हा सण मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी समाजसेवक रशादशेठ मुजावर, लालाशेठ अत्तार, अनिस मनियार, वसिम अत्तार, इजाज मनियार, अजहर अत्तार, साकिब मुजावर, भाऊ मुजावर यांच्यासह अनेक तरूण उपस्थित होते. पेण पालिकेचे गटनेते अनिरूद्ध पाटील, युवा नेते ललित पाटील, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, अजय क्षीरसागर, सतीश मेहतर, अविनाश म्हात्रे, गुन्हा अन्वेषण शाखेचे घरत यांनी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

पळसदरी येथे आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पळसदरी परिसरातील 141 जणांनी शिबिराचा लाभ घेतला. कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील स्वामी समर्थ मठात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ फाऊंडेशन व स्वास्तिक फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, पळसदरी उपसपंच नेत्रा  दरेकर, वकील राजेंद्र निगुडकर, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता अजयकुमार सर्वगोड, स्वास्तिक फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश फाटक, संचालिका साधना तेलतुंबडे, भरत कदम, वसंत पालांडे, प्रभाकर देशमुख, प्रताप सुर्वे आदी उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply